
गेल्या आठवडय़ात जेन झींच्या शिवाजी पार्क येथील आंदोलनावेळी भररस्त्यात पोलिसांच्या गाडीसमोर उभी राहून गाडी अडविणारी मॉडल रिया अहिर ही त्या प्रकारानंतर चांगलीच व्हायरल झाली. समाजमाध्यमांवर तिचे काैतुक होऊ लागले. पण त्याचबरोबर समाजमाध्यमांवर तिला ट्रोल करण्यात येऊ लागले आहे, इतकेच नाही तर धमक्याही येऊ लागल्याने रियाने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. रियाने आपल्या तक्रारीसोबत धमकीचे स्क्रीनशॉट्स, यूआरएल आणि इतर डिजिटल पुरावे सादर केले आहेत.
जेव्हा तुम्हाला मोठे व्यासपीठ मिळते, तेव्हा कोटय़वधी लोक तुमचे काैतुक करतात; पण काही जण तुमच्याविरोधातही बोलतात. कोणालाही दुसऱ्याची बदनामी करण्याचा किंवा त्याला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हे आंदोलन आपल्या सर्वांच्या हक्कांसाठी होते; कोणत्याही पक्षासाठी, धर्मासाठी नव्हते. मी पुढेही जे काही चुकीचे आहे त्याविरोधात ठामपणे आवाज उठवत राहीन, असे रियाने म्हटले आहे.






























































