
राज्यामध्ये होत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात पेपर फुटले हे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. कारण पेपरफुटीतले लाभार्थी हे सर्व त्यांच्याच पक्षातले आहेत. नीटचे पेपर फोडणारे जेलमध्ये असले तरी ते त्याच नेटवर्कमध्ये काम करताहेत. लाभार्थी ही तेच आहेत आणि पेपर फोडणारे तेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी केव्हातरी मान्य करावे की पेपर फुटले आहेत असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.
महाराष्ट्र हे कधीकाळी शिक्षणाच्य्या बाततीत प्रतिष्ठीत राज्य होतं. आज महाराष्ट्राचं नाव सर्वात खाली गेलंय याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. जंतरमंतरच्या मुलांनी मोदींच्या भाषणावर जी हास्यजत्रा सुरू केली. त्यावर आमचे मुख्यमंत्री म्हणतात मोदीजींचा व्हिडीओ इतक्या लाखो लोकांनी पाहिला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी जंतरमंतरवरील डिजीटल मास्टर मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले पाहिजे. आयटी सेलकडून शिकून चालणार नाही. आयटी सेल आता पुरातन काळात गेलं. आता खरी डिजिटल इंडिया ही देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून पाहिली. आयटी सेलला टाळं लावावं लागलं.
रिझर्व बॅंक आता प्लास्टिकच्या नोटा आणणार या माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मोदींच्या मनामध्ये काय येईल ते सांगता येत नाही. इटलीत गेल्यावर त्यांनी पाहिल्या असतील तशा नोटा. त्यांना हल्ली इटलीचं आकर्षण आहे. तिथे बाद होणारी नोट इथे घेऊन येताहेत. शरद पवार वरचेवर मोदींना भेटताहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, हे बघा कुणी कुणाला भेटले तरी मोदी शहा काय 2029 ला राहात नाहीत हे शरद पवारांनाही माहीत आहे. मोदी तो गयो…




























































