
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तब्बल 880.52 मेट्रिक टन एवढा सोन्याचा साठा आहे. याबाबत केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती दिली. आरबीआयकडे सध्या किती सोनं आहे? अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले, की 31 मार्च 2024 रोजी आरबीआयकडे 822.10 मेट्रिक टन सोने होते. गेल्या वर्षी हा साठा वाढून आरबीआयकडे 879.58 मेट्रिक टन एवढा झाला. मात्र, देशातील धार्मिक संस्था आणि कुटुंबांकडे किती सोने आहे, यासंदर्भातील माहिती नसल्याचे चौधरी म्हणाले.




























































