‘जेन-झी’ तरुणी म्हणजे जनरेशन गटर ! – कंगना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी आज जेन-झी तरुणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. ‘जेन-झी पिढीतल्या तरुणी म्हणजे जनरेशन गटर आहेत,’ असे कंगना म्हणाल्या.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगनाने जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या जेन-झींना टार्गेट केले आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू महिलांबद्दल कंगना म्हणाल्या, त्यांना स्वातंत्र्य हवे, पण जबाबदारी नको असते. माझ्या दृष्टीने त्या जनरेशन गटर आहेत.

कंगनांना भाजपमध्येही कोणी गंभीरपणे घेत नाही !
कंगना यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सीजेपी प्रवक्ता सौरव दास म्हणाला, ‘कंगना यांना त्यांच्या पक्षातही कुणी गंभीर घेत नाही. कंगनांपेक्षा कितीतरी पट जास्त काम जेन-झीने देशासाठी केले आहे,’ असे सौरव दास याने सुनावले.