आशियाई स्पर्धेसाठी हिंदुस्थानी हॉकी संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण मुकुट कायम राखण्याचा निर्धार करत हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाने जपानमध्ये होणाऱया आपल्या 20 सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. संघात फक्त एकच बदल करण्यात आला असून, युवा खेळाडू आदित्य लगाले याच्या जागी अनुभवी मध्यरक्षक राजकुमार पाल याला संधी देण्यात आली आहे.

विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातून राजकुमार पाल याचे पुनरागमन हाच संघातील एकमेव बदल आहे, तर आदित्य लगाले विश्वचषक संघासोबत कायम राहणार आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत सिंग करणार असून, अनुभवी मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग यांच्यावर संघाची जबाबदारी असेल.

हिंदुस्थानचा ‘अ’ गटात यजमान जपानसह दक्षिण कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यासोबत समावेश आहे. हिंदुस्थानी संघ 20 सप्टेंबरला इंडोनेशियाविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार असून, त्यानंतर श्रीलंका, दक्षिण कोरिया, जपान आणि बांगलादेशशी लढत देईल.

हिंदुस्थानचा पुरुष हॉकी संघ

गोलरक्षक – मोहित एचएस, सूरज करकेरा.

बचावपटू – जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच.

मध्यरक्षक-  राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद.

आघाडीची फळी – दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक.