
पवई आयआयटीच्या मटेरियल सायन्स इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत विद्यार्थी हा मूळचा राजस्थानचा रहिवासी होता. सोमवारी दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू झाले होते. मंगळवारी तो विद्यार्थी वर्गात आणि कॅम्पसमध्ये दिसला. मात्र तो फोनला प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या पालकांनी आयआयटीच्या सुरक्षा रक्षकांना संपर्क साधला. त्यांनी वसतिगृहात जाऊन त्यच्या खोलीचा दरवाजा ठोठावला त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सुरक्षा रक्षकाने खिडकीतून आत डोकावले. तेव्हा तो विद्यार्थी हा छताला लटकलेला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पालिसांनी घटनास्थळी धाव घेत अपमृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.






























































