शेख हसीना बांगलादेशात जाण्यावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या मायदेशी परतण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अटक, कारावास आणि थेट फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार असतानासुद्धा डिसेंबर महिन्यापर्यंत बांगलादेशात परतेन, असे त्यांनी स्पष्ट केले. मायदेशी परतल्यानंतर होणाऱया कोणत्याही गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शेख हसीना म्हणाल्या की, मला माहिती आहे, माझी हत्या केली जाऊ शकते, मला अटक केली जाऊ शकते, तुरुंगातही डांबले जाऊ शकते. मला माझ्या भवितव्याची पूर्ण कल्पना आहे. तरीही मला माझ्या मायदेशी परत जायचे आहे. कारण माझे लोक मला हाक मारत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.