
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका निवृत्त बसचालकाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या बस चालकाच्या घरातून तब्बल 28 कोटींची रोकड व 15 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहेत. मीनार मोंडल असे त्या बस चालकाचे नाव आहे.
रोख रक्कम आणि सोने जप्त केल्यानंतर पोलिसांनी मीनार मोंडल याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की, ही सर्व मालमत्ता टुलू मोंडल आणि त्यांच्या बेकायदेशीर व्यापाराची आहे.
रात्री उशिरा मारलेल्या छाप्यात सुरुवातीला 5.5 कोटी रुपयांची रोकड आणि 15 किलो सोने जप्त करण्यात आले होते. नंतर अधिक शोधाशोध केल्यानंतर आणखी तेवीस कोटी रुपये पोलिसांना सापडले. ही रोकड मोजताना पोलिसांच्या रोकड मोजणाऱ्या तब्बल पाच मशिन बंद पडल्या
मिनार मोंडल हा तृणमूल काँग्रेसचे माजी नेते अनुब्रत मोंडल यांचा निकटवर्तीय आणि हिरे व्यापारी टुलू मोंडल यांचा नातेवाईक आहे.



























































