
शिवसेना पक्ष आणि त्याच्या अधिकृत चिन्हावर नेमका कोणाचा अधिकार असणार, या महत्त्वपूर्ण प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती एखाद्या ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांना देणे हा सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा आहे. निवडणूनक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांनी मिळून केलेला घोटाळा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्यघटनेतील परिशिष्ट 10 चा आणि अँटिडिफेक्शन लॉचा आधार घेत ते म्हणाले संविधानातील या तरतूदीचे न्यायालयाने पालन केल्यास मिंदे गटातील सर्व सदस्य हे अपात्र ठरतील. न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच याविषयीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तर 100 टक्के मिंदे गटात गेलेला प्रत्येक अपात्र ठरेल. हे आमच्या पक्षाचे मालक कसे झाले? हा सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने केलेला सर्वात मोठा घोटाळा आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेनी स्थापन केलेली शिवसेना ती एखाद्या ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना देणे हा सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा. निवडणूनक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांनी मिळून केलेला घोटाळा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्हाला खात्री आहे की, जर सर्वोच्च न्यायालयाने निष्पक्ष निर्णय दिला, तर मिंदे यांच्यासोबत गेलेला प्रत्येक माणूस 100 टक्के अपात्र ठरेल असाही विश्वास व्यक्त केला.
तरुण मुलांना बेरोजगार, कॉक्रोच बोलणं हे कोणत्या संविधानात बसतंय.?
कॉक्रोच का चिडले?. तरुण मुलांना आणि बेरोजगारांना कॉक्रोच बोलणं हे कोणत्या संविधानात बसतंय.? जर आमच्यावर कोर्ट अन्याय करतंय तर आम्ही गप्प बसायचं का? तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार असाल, पक्षफुटीला खतपाणी घालणार असाल, डिफेक्शनला खतपाणी घालणार असाल तर जनतेने गप्प बसावं अशी न्यायालयाची अपेक्षा आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
तर अख्ख्या पुणेकरांनी विरोध करायला हवा
मला कोणीतरी सांगितले की, हे महाशय जे आहेत अमित शहा जनरल कायर यांना पुण्यात कोणी कार्यक्रमाला बोलावले आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. मुलांवर गोळीबार करायला लावणाऱ्या महाशयांना ज्या पुणेकरांनी बोलावले आहे त्यांना लाज वाटली पाहिजे, लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार, मुलांच्या रक्ताने रंगलेले त्यांचे हात आहेत . अख्ख्या पुणेकरांनी विरोध करायला हवा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.





























































