हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजापुरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘शोध नवमूर्ती कलाकारांचा’ या अभिनव संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेत लहान गटात दुर्वा पराडकर आणि मोठ्या गटात आदित्य मांडवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

राजापूर हायस्कूल कलामंदिर येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांची असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.यावेळी उपजिल्हा प्रमुख रविंद्र डोळस, तालुका प्रमुख कमलाकर कदम, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुका प्रमुख अनाजी गोटम, अभिजित तेली, युवासेना उपजिल्हा संतोष हातणकर, तालुका अधिकारी सुभाष नवाळे, शिवसहकार तालुका संघटक प्रभाकर कानडे, विभाग प्रमुख रुपेश नारकर, विलास नारकर, शांताराम तळवडेकर, नरेश शेलार, शहर प्रमुख अनिल कुडाळी, विभाग अधिकारी अमित मोंडे, शहर संपर्क प्रमुख सत्यवान कदम, विभागसंघटक स्नेहा उगले, धनश्री मांजरेकर, शहर युवती प्रतीक्षा मांजरेकर, उपशहर युवती गार्गी चिपटे, उपविभाग प्रमुख विठोबा हर्याण, नामदेव नागरेकर, मंगेश पराडकर, किरण बेर्डे सर, सरपंच राजू सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेत छोट्या गटात दुर्वा पराडकर, शुभ्र पाटकर आणि चिरायू कुळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात आदित्य मांडवकर, वरद् रहाटे आणि तनिष्क गुरव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.स्पर्धेत परीक्षक म्हणून विशाल मसणे व संदीप सुवारे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच शाखाप्रमुख श्रीकृष्ण नागरेकर, संजय पेडणेकर, संतोष बाकाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.