
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत आलेल्या 17 वर्षीय तरुणाचा धावत्या लोकलमधून तोल जाऊन मृत्यू झाला होता. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच मुंब्राजवळ धावत्या लोकलमधून पडून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. साईराज बेणारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी लोकल मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ ही दुर्घटना घडली. गर्दीच्या वेळी दारात उभा असलेला साईराज बेणारे हा तरुण रेल्वेतून थेट मुंब्रा खाडीमध्ये पडला आणि लोखंडी रॉडला अडकला. घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
धावत्या लोकलमधून तोल जाऊन तरुणाचा मृत्यू, गेटवर उभे राहणे जिवावर बेतले



























































