आषाढी अमावास्येनिमित्त 800 हून अधिक दिवे उजळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आषाढी अमावास्येनिमित्त दीपपूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन ८०० हून अधिक दिवे प्रज्वलित केले. बुधवारी सकाळी पावणेबारा वाजता हा उपक्रम पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ व्हावी यासाठी दीपपूजेसह सरस्वती स्तोत्र, गायत्री मंत्र, दीपज्योती स्तुती, दीप स्तोत्र व ध्यानसाधनेचे प्रशिक्षण देण्यात आले.