
दिल्लीचे माजी मंत्री व आप नेते सत्येंद्र जैन यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी अटक केली आहे. दिल्ली जल बोर्डातील कथित घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर सत्येंद्र जैन यांना राऊज अवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.
#WATCH | Delhi | Former Delhi Minister Satyendar Jain, arrested by the Anti-Corruption Branch (ACB), brought to Rouse Avenue Court
He is arrested for alleged large-scale irregularities, manipulation of tender conditions, and criminal conspiracy in the tendering process… pic.twitter.com/k4bDprWn3Z
— ANI (@ANI) August 19, 2026
दिल्लीत आपची सत्ता असताना सत्येंद्र जैन हे पाणी व जलसंसाधन तसेच शहर विकास मंत्री होते. त्यावेळी दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या नूतनीकरणाच्या निविदा प्रक्रियेत ठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचा आरोप आहे. तसेच या दरम्यान अनेक निविदा अटींमध्ये फेरफार झाल्याची तक्रार दक्षता संचालनालयाने केली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर ACB ने सत्येंद्र जैन यांच्यासह दिल्ली जल बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय व अन्य सहा जणांना अटक केली.




























































