
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. श्रीलंकेतील गॅल्ले मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नवोदित गोलंदाज मानव सुथार याने दहा विकेट घेत श्रीलंकन फलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा हा 600 वा कसोटी सामना होता.
A clinical victory for #TeamIndia in the Galle Test.
Manav Suthar’s 6 wicket haul in the second innings, guides India to a 165 run win over Sri Lanka.
Scorecard – https://t.co/M9LVyCAp8y #SLvIND pic.twitter.com/QxAhFQGZke
— BCCI (@BCCI) August 19, 2026
टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. देवदत्त पडिक्कल याच्या 167 धावांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर व केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 462 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने 284 धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 193 धावात करत श्रीलंकेला विजयासाठी ३७२ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र मानव सुथारच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे श्रीलंकंन फलंदाजांनी नांगी टाकल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 206 धावांवर बाद झाला. यातील सहा गडी मानवने बाद केलेले होते.





























































