
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गावर नागपूर – मुंबई मार्गिकेवरील इगतपुरी बोगदा गुरूवारी एक तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बोगद्यात गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 ते 1.00 वाजेदरम्यान अग्निशमन प्रतिबंधक उपाय योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. यामुळे या कालावधीत एक तासासाठी हा बोगदा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत नाशिक/ इगतपुरीहून तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी इगतपुरीपासून जुना मुंबई आग्रा महामार्गाने घाटातून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत नागपूर दिशेकडील इगतपुरी बोगदा वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे.



























































