महाआदित्य रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद; अंबरनाथमध्ये 500 तरुणांना ऑन द स्पॉट नोकऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अंबरनाथमध्ये महाआदित्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. ५०० हून अधिक तरुणांना विविध कंपन्यांमध्ये ऑन द स्पॉट नोकऱ्या मिळाल्या. हक्काचा रोजगार मिळाल्याने तरुण-तरुणींनी शिवसेनेचे आभार मानले.

शिवसेना, युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्र तसेच शिवसंचार सेना व निर्माण ऑर्गनायझेशन यांच्या वतीने महात्मा गांधी हॉल, अंबरनाथ (पश्चिम) येथे २६ ऑगस्ट रोजी महाआदित्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शिवसेनेचे राज्य संघटक, शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आणि उपनेते, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या हस्ते झाले. या मेळाव्याला बेरोजगार युवक-युवतींनी प्रचंड प्रतिसाद दिला. ५०० पेक्षा अधिक उमेदवारांना विविध क्षेत्रांत ऑन-द-स्पॉट रोजगार प्राप्त झाला.

यावेळी कल्याण पूर्व लोकसभा जिल्हाप्रमुख शरद पाटील, महिला जिल्हा संघटक अंजली राऊत, रमेश डोंगरे, भीमसेन मोरे, राजेद्र शाहू, नारायण पाटील, अनिल भोईर, डॉ. जानू मानकर, संतोष शिंदे, अॅड. संदीप पगारे, प्रशांत धांडे, हेंमत चौधरी, शिवाजी जावळे, दिलीप मिश्रा, राजन वेलकर, अंकुश भांडे, निर्माण ऑर्गनायझेशनचे मिलिंद भोसले आदी उपस्थित होते.

रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी युवासेना पदाधिकारी राज महाडिक, महेश दुर्गुडे, दाहीर रामटेके, प्रतीक लोटलीकर, अजय मोरे, बच्चीतर सिंग, अजय मोरे, प्रवीण गोसावी, पंकज साटम, संजीवनी साहसने, व्यंकटेश गुरव, विशाल माने, निरंजन पाटील, ओम घोणे, सुमित घोणे, हितेश नागपाल यांच्यासह युवा सैनिकांनी परिश्रम घेतले.

अभिमानास्पद उपक्रम

युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचा उपक्रम अभिमानास्पद आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची दिशा दाखवण्याचा हा उपक्रम पुढील काळातही सुरू ठेवण्याची ग्वाही राज्य संघटक अखिल चित्रे आणि उपनेते गुरुनाथ खोत यांनी दिली.