
मराठा समाजाला संपवायचे ही सरकारची भूमिका आहे. सरकार ज्या पद्धतीने वागेल त्याच पद्धतीने मराठा समाजही सरकारसोबत वर्तन ठेवेल. मराठेच मराठय़ांच्या अंगावर सोडायचं हे नाटक खेळू नका. एकनाथ शिंदे यांनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा ते एका फटक्यात संपतील, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी इशारा दिला.






























































