उल्हासनगरमध्ये सात स्वीकृत नगरसेवकांसाठी उद्या निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे ४ आणि शिंदे गटाचे ३ स्वीकृत नगरसेवक उल्हासनगर महानगरपालिकेत जाणार आहेत. मात्र त्यासाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करताना भाजपने आपल्या ४ नावांवर शिक्कामोर्तब केले. तर शिंदे गटाकडून ३ जागांसाठी तब्बल २१ जणांनी अर्ज दाखल केले. इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने शिंदे गटाने अधिकृत तीन उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

महापौर अश्विनी निकम यांच्या आदेशानुसार आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ७ सप्टेंबर रोजी स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज भरणे आणि ११ सप्टेंबर रोजी होणारी विशेष महासभा ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली होती. या प्रक्रियेच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने २५ सप्टेंबरच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी निवडणुका होत आहेत. भाजपने प्रदीप रामचंदानी, धनंजय बोडारे, कपिल अडसूळ आणि बाळा श्रीखंडे ही ४ नावे निश्चित केली आहेत. या चौघांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. दुसरीकडे शिंदे गटाकडून ३ जागांसाठी २१ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.