Asian Games 2026 – ऑलिम्पिक विजेत्या मनु भाकरचा ‘नेम’ चुकला; महिला संघाचेही पदक हुकले, हिंदुस्थानला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वेळेची ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर हिला आशियाई खेळांमधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यासह हिंदुस्थानी महिला संघालाही कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यामुळे हिंदुस्थानला मोठा धक्का बसला.

नागोया येथे पार पडलेल्या स्पर्धेत 24 वर्षीय मनु भाकरने 579 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहून अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम फेरीत तिची कामगिरी खालावली आणि 181.1 गुणांसह तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सामना टाय, तरीही कांस्य हातातून निसटले, ‘सेंशु’चा चेतन भट्टला धक्का; तैपेईचे कराटेमध्येही पदक

मनुने नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिक्स टीम प्रकारात कांस्यपदके जिंकली होती. आता सर्वांचे लक्ष तिची मुख्य स्पर्धा असलेल्या 25 मीटर पिस्तूल प्रकाराकडे लागले असून या प्रकारात ती विद्यमान विजेती आहे.

महिला संघ चौथ्या स्थानावर

इतर हिंदुस्थानी नेमबाजांमध्ये ईशा सिंग 572 गुणांसह 15 व्या, तर सुरूची सिंग 568 गुणांसह 26 व्या स्थानावर राहिल्यामुळे त्या अंतिम फेरी गाठू शकल्या नाहीत. वैयक्तिक फेऱ्यांमधील या गुणांच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने एकूण 1719 गुणांची कमाई केली. व्हिएतनामच्या संघाचेही 1719 गुणच होते. मात्र, व्हिएतनामच्या नेमबाजांनी अधिक इन्नर 10 गुण मिळवल्यामुळे भारताला कांस्यपदक गमवावे लागले आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Asian Games 2026 – दगडफेकीतून पदकापर्यंत; फरिबाचे देशाला पहिले पदक