
‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट बसगाड्यांचा प्रवास अलीकडच्या काळात ‘रामभरोसे’ बनला आहे. बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी गाड्यांचे प्रमाण वाढले असतानाच या गाड्या चालवणाऱ्या कंत्राटी चालकांचे बेदरकार ड्रायव्हिंग मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. गेल्या 17 महिन्यांत तब्बल 789 कंत्राटी चालकांनी बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याऐवजी महायुती सरकारच्या काळात बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत याच पंत्राटी गाड्यांना वारंवार अपघात होत असल्याने चालकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर कंत्राटी चालकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगची आकडेवारी पुढे आली आहे. जानेवारी 2025 ते मे 2026 या कालावधीत बेदरकारपणे बस चालवल्या प्रकरणी एकूण 898 चालकांवर कारवाई करण्यात आली.
आगारनिहाय प्रकरणे
सांताक्रुझ 324
माहीम 50
मजास 46
पुलाबा 43
गोरेगाव 31
धारावी 23




























































