
मराठी रंगभूमीला नाटय़संगीताचा समृद्ध, वैभवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवणारा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले येथे रात्री 8.30 वाजता होणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजिलेल्या कार्यक्रमात ओमकार प्रभुघाटे, केतकी चैतन्य, धनंजय म्हसकर नाटय़गीते सादर करतील. हर्षल काटदरे, प्रसाद पाध्ये, राजेंद्र भावे, हनुमंत रावडे, अथर्व चांदोरकर यांची साथसंगत लाभेल. प्रवेशिका सोमवार, 5 ऑक्टोबरपासून नाटय़गृहावर उपलब्ध आहेत. त्याचा अधिकाधिक लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

























































