वर्षअखेरपर्यंत 114 राफेलची खरेदी; संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची लष्करी पॉवर वाढवण्यासाठी 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून वर्षअखेरीपर्यंत ही डील पूर्ण होईल, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली आहे. सध्या कंपन्यांकडून मिळालेल्या प्रस्तावांची छाननी केली जात आहे. भारताला या करारात जास्तीत जास्त स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, असे ते म्हणाले.

या विमानांमध्ये भारतात निर्मित शस्त्रs आणि इतर यंत्रणा बसवण्यात येतील. फ्रान्सची कंपनी आधी खरेदी केलेल्या राफेल मरीन विमानांमध्येही भारतीय शस्त्रs बसवण्यास सहमत झाली आहे. ही खरेदी ‘बाय ऍण्ड मेक’ मॉडेलअंतर्गत केली जाईल. याअंतर्गत राफेल बनवणाऱया कंपनीसोबत मिळून हिंदुस्थानात विमानांची असेंब्ली आणि उत्पादनाशी संबंधित कामे केली जातील. संरक्षण मंत्रालयाला मिळालेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुढे जाईल, असे ते यावेळी म्हणाले. हिंदुस्थानने यापूर्वीच राफेल मरीन विमाने खरेदी केली आहेत. आता फ्रान्सची कंपनी या विमानांमध्ये भारतीय शस्त्रs बसवण्यासाठी तयार आहे. नव्या खरेदीमध्येही हिंदुस्थानी शस्त्रs आणि प्रणालींचा वापर वाढवण्याची योजना आहे. ‘तेजस एमके 2’ चे पहिले उड्डाण 2027 च्या मध्यात करण्याचे नियोजन आहे. प्रथम त्याचे प्रोटोटाइप तयार केले जातील. त्यानंतर भारतीय हवाई दल त्यांची चाचणी घेईल. ‘तेजस एमके 2’ विकसित करण्याची मुख्य जबाबदारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलची असेल. हे टप्प्याटप्प्याने विकसित केले जाईल. गरजेनुसार त्यात नवीन बदल केले जातील.