। मदे मत्सरे सांडली स्वार्थ बुद्धी।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  संध्या शहापुरे

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च। अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् (भगवद्गीता अध्याय सोळावा श्लोक 4) भगवंत म्हणतात- हे पार्थ, दांभिकता, बळाचा गर्व, अभिमान क्रोध, निष्ठूरपणा, अज्ञान हे दुर्गुण आसुरी संपत्तीत जन्मलेल्या माणसांमध्ये राहतात. गीतेतील या श्लोकावर, यातील सहा दुर्गुणांवर ज्ञानदेवांनी केलेले विवेचन पहा- (अध्याय सोळावा ) ‘दंभ कसा असतो? जैसी आपली जननी, नग्न दाविलीया जनी, ते तीर्थचि परी, पतनी कारण होय।’ ज्याप्रमाणे आपली माता ही तीर्थाप्रमाणे पावन पण तिलाच विवस्त्र करून, जगात दाविली तर ते तीर्थाचेच पतन होते. जसे, वाचेच्या चव्हाटय़ावर आपण आचरलेल्या धर्माचा पसारा मांडला तर तो धर्मच अधर्म होतो आणि दंभ या नावाने ओळखला जातो. मद कसा असतो? काटेरी कुंपणावर मान उंचावून बसलेला सरडा जसा, स्वर्गही आपल्या खालीच आहे असे समजतो. समर्थ रामदास म्हणतात… ‘सर्वोत्तमाच्या दासाला स्वार्थ बुद्धी नसते’. कारण त्याला मद, मत्सर नसतो. त्याला संसाराची कोणती उपाधी नसते. ते सर्व, अशाश्वत आहे याचे त्याला भान असते. याचे बोलणे नम्र असते, संभाषण मधुर असते. म्हणूनच, असा सर्वोत्तमाचा दास धन्य होय.