
अज्ञात कारणातून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चिपळूण शहरातील शंकरवाडी येथे सोमवारी सायंकाळी घडली. मृणाली प्रफुल्ल खेराडे (27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृणाली या मंडणगड तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. मृणाली खेराडे यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृतदेहावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि चार वर्षांचे मूल असा परिवार आहे. या घटनेबाबत चिपळूण पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.




























































