
जगात अत्यंत प्रतिष्ठsचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार हिंदुस्थानी वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना जाहीर झाला. शांतता प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पिल्लई यांना हा सन्मान मिळाला आहे. नोबेल पुरस्काराच्या अधिपृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नावी पिल्लई यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. यामुळे आठ युद्धे संपवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. ट्रम्प यांना नोबेलने हुलकावणी दिली आहे.
नोबेल समितीला पुरस्कारासाठी 287 उमेदवारांचे नामांकन प्राप्त झाले होते, ज्यामध्ये संस्थांचे प्रमाण एक चतुर्थांशाहून थोडे अधिक होते. परंपरेनुसार नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा 10 डिसेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आयोजित केला जातो. या पुरस्कारासोबत 1.2 कोटी स्वीडिश क्रोनर इतकी रक्कम दिली जाते. नावी यांचे कुटुंब मूळचे तामीळनाडूतील होते. नावी पिल्लई यांच्या आजी-आजोबांना 1890 च्या दशकात उसाच्या शेतात मजुरी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आले होते.
रवांडा नरसंहारातील पीडितांना न्याय
नावी पिल्लई यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे रवांडा नरसंहाराशी संबंधित खटले. 1994 मध्ये रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात लाखो लोकांचा मृत्यू झाला. 1995 मध्ये नवी पिल्लई यांची या न्यायाधिकरणावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी अशा महत्त्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली, युद्ध आणि नरसंहाराच्या काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराकडे त्यांनी लक्ष वेधले.




























































