
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेते आणि विद्यार्थी संघटनांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्ला चढवला. ज्ञानेश कुमार एक माफिया आहे आणि ज्याने संपूर्ण सिस्टिमचे गुन्हेगारीकरण केले, असा घणाघात संजय राऊत यांनी यावेळी केला.
ज्ञानेश कुमार एक माफिया आहे. ज्ञानेश कुमार असे माफिया आहे ज्यांनी संपूर्ण सिस्टिमचे गुन्हेगारीकरण केले आहे. आणि अशा माफियाशी कसं लढायचं आणि कसं निपटायचं हे आम्हीला माहिती आहे. १०-१२ वर्षांपर्यंत मोदी आणि शहांनी देशाला धमकावत आणि भीती दाखवत ठेवलं होतं. आता घाबरण्याचे वेळ त्यांची आहे. आता घाबरून लपले आहेत. दिल्लीत लष्कराचे चार लाख जवान तैनात करून घरात बसले आहेत. पण राहुल गांधींच्या नेतृत्वातील जो संघर्ष आहे तो सुरूच राहील. दिल्लीत, राज्यांमध्ये, प्रत्येक शहरात सुरू राहील. आम्ही सगळे एकजूट आहोत आणि एकत्र राहू, असे संजय राऊत म्हणाले.



























































