मोदींची मतचोरीची योजना उघड करण्यासाठी दिल्लीत तरुण आणि नागरिक एकवटले – मल्लिकार्जुन खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतचोरीची योजना उघड करण्यासाठी दिल्लीमध्ये तरुण आणि सामान्य नागरिक पहिल्यांदाच स्वतःहून एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी जनतेचे प्रश्न अत्यंत गांभीर्याने आणि निष्ठेने मांडले आहेत. या प्रयत्नांचे मोठे यश तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याच्या घटना खूप दुर्मिळ आहे.”

दिल्लीतील जनतेच्या वाढत्या प्रतिसादावर भाष्य करताना खरगे यांनी म्हणाले की, “दिल्लीत पहिल्यांदाच असे घडले आहे की, तरुण आणि सामान्य नागरिक स्वतःहून पुढाकार घेत एवढ्या मोठ्या संख्येने एकवटले आहेत. हे चित्र तुम्ही सर्वांनी स्वतः पाहिले आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक सविस्तर बोलू इच्छित नाही. आता पंतप्रधान मोदींची मतचोरीची योजना पूर्णपणे उघड करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे.”