कश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमवृष्टी, पर्वतीय भागात बर्फाची चादर; तापमानात मोठी घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱ्यांत हिमवृष्टीला सुरवात झाली आहे. उत्तर कश्मीरमध्ये गुलमर्गच्या बुटापथरी आणि अफवारवत पर्वतांवर बर्फाची चादर पसरली आहे. हिमवृष्टीमुळे तापमानात घसरण झाली आहे. हवामानातील या बदलाचा दिवसाच्या तापमानावरही परिणाम होत असून थंडीचा कडाका वाढत आहे.

हवामान विभागाच्या मते, पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे जम्मू आणि कश्मीरच्या अनेक भागांमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पर्वतीय भागात हिमवृष्टी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊन आणि रस्त्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.