
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या एका वेगळ्या रुपाला तिचे आवडते मानले जाणारे खाद्यपदार्थ अर्पण केले जातात.
खालीलप्रमाणे नैवेद्य अर्पण करता येतो. शैलपुत्री – तूप किंवा साजूक तुपाचा नैवेद्य. ब्रह्मचारिणी ः साखरेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य. चंद्रघंटा ः खिरीचा नैवेद्य. कुष्मांडा ः मालपुआ. स्पंदमाता ः केळी किंवा फळांचा नैवेद्य. कात्यायनी ः मध. कालरात्री ः गुळाचा नैवेद्य. महागौरी ः नारळ. सिद्धिदात्री ः तीळ, पुरी-चणे आणि हलवा.





























































