
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थआपक अभिजीत दीपके यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले असून आज त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. दिल्लीत तिरंगा मार्चपूर्वी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते.
शुक्रवारी संध्याकाळी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे आयोजित तिरंगा मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी करोल बागच्या झंडेवालान येथील निवासस्थानातून बाहेर पडताच पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. भादवि कलम 126 आणि 170 अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांना शनिवारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
दुसरीकडे नेहा बोरा यांनाही दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम 65 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 5 तास दिल्लीतील विविध ठिकाणी फिरवण्यात आले आणि नंतर आर.के. पुरम पोलीस ठाण्यात नेण्यात आले, असा आरोप एआयएसएने केला आहे. मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वकिलांनाही त्यांना भेटू दिले गेले नाही, असेही त्यांनी म्हटले.
काल मंडी हाऊस येथून मला ताब्यात घेण्यात आले आणि पहाटे पाच वाजता माझी सुटका केली. बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आणि कायदा-सुव्यवस्थेला हरताळ फासण्यात आली. आंदोलनात सहभागी होणाऱ्या पकडून दुसऱ्या दिवशी सोडले जात आहे. हे कोणत्या कायद्याने सुरू आहे? असा सवाल नेहा बोरा यांनी केला. तसेच भाजपने आपला अहंकार सोडावा आणि दिल्लीतील कर्फ्यूही उठवावा, असेही नेहा बोरा म्हणाल्या.
VIDEO | Delhi: AISA chief Neha Bora released from preventive detention, demands CJP’s Abhijeet Dipke’s release from detention.
#NehaBora #AbhijeetDipke #DelhiPolice
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/lj9dZwG5la
— Press Trust of India (@PTI_News) October 17, 2026
दरम्यान, बॉण्डचे उल्लंघन, बेकायदेशीर प्रवेश आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही अटक करण्यात आलेली आहे. जंतरमंतरवर समर्थकांसह राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या ते तिहार कारागृहातच बंदिस्त आहेत. तर अभिजीत दीपके यांच्या अटकेनंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे.




























































