
>> नीलिमा प्रधान
मेष – नोकरीत प्रभाव वाढेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. जवळच्या व्यक्तीची नाराजी दूर करता येईल. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतापजनक प्रसंगांकडे दुर्लक्ष नको. कल्पकता वाढेल. शुभ दि. 18, 20
वृषभ – व्यवहारात फसगत टाळा
सूर्य चंद्र षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो अरेरावी नको. भावुक होऊन चूक करू नका. व्यवहारात फसगत टाळा. नोकरीधंद्यात तडजोड ठेवा. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नको. कायदा पाळा. शुभ दि. 19, 20
मिथुन – चातुर्याने यश मिळवाल
चंद्र, बुध त्रिकोणयोग. दसऱयाच्या दिवशी दडपण येईल. चातुर्याने मोठे यश मिळवाल. नोकरीत दगदग होईल. धंद्यात आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. लोकसंग्रह वाढवा. स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दि. 21, 22
कर्क – चौफेर सावध रहा
रवि, शुक्र युती. जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. कौटुंबिक समस्या सोडवण्यात दगदग होईल. नोकरीधंद्यात तणाव जाणवेल. चौफेर सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे मांडताना सावध रहा. शब्द जपून वापरा. शुभ दि. 19, 20
सिंह – अंदाज चुकतील
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. चौफेर असलेले दडपण कमी होईल. प्रवासात सावध रहा. दसऱयाच्या दिवशी अंदाज चुकेल. संताप आवरा. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. तुमच्या चुका दाखवल्या जातील. शुभ दि. 21, 22
कन्या – आत्मविश्वास वाढेल
चंद्र, गुरू प्रतियुती. क्षुल्लक तणाव वाढवू नका. तुमचे महत्त्व वाढेल. कामे वेगाने पूर्ण कराल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कठीण कामे पूर्ण करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. व्यवहारात यश मिळेल. शुभ दि. 20, 24
तूळ – अहंकार दूर ठेवा
सूर्य, शुक्र युती, क्षुल्लक अडचणींवर मात करून मोठे यश मिळवाल. विजयादशमीच्या दिवशी तुमचा अंदाज चुकेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. अहंकारयुक्त भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 18, 19
वृश्चिक – प्रकृतीची काळजी घ्या
चंद्र, गुरू प्रतियुती. भ्रमात राहू नका. गैरसमज होतील. सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात मोठा निर्णय नको. नवीन ओळख तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणालाही कमी लेखू नका. शुभ दि. 19, 20
धनु – सहनशीलता बाळगा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस उत्साहाचा व यशाचा. संयम व सहनशीलता ठेवा. गुप्त कारवाया मोडून काढा. नोकरीधंद्यात प्रभाव जाणवेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा मिळेल. शुभ दि. 19, 20
मकर – रागावर ताबा ठेवा
सूर्य, शुक्र युती. तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. रागावर ताबा ठेवा. नोकरी वा धंद्यात नवा पर्याय लाभेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. जम बसवा. शुभ दि. 20, 21
कुंभ – संमिश्र स्वरूपाचे यश लाभेल
सूय्र, शुक्र युती. संमिश्र स्वरूपाचे यश लाभेल. विजयादशमीच्या दिवशी प्रकृतीची काळजी घ्या. तणाव वाढवू नका. जवळच्या व्यक्ती साहाय्य करतील. नोकरीत सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व टिकवा. शुभ दि. 18, 19
मीन – अनाठायी खर्च होतील
सूर्य, चंद्र षडाष्टक योग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. मनावर दडपण येईल. वस्तू नीट सांभाळा. अनाठायी खर्च होईल. जवळच्या व्यक्तींना जपा. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. शुभ दि. 18, 20





























































