
अॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आयफोन डय़ुओच्या बुकिंगला सुरुवात झाली असून या फोनची किंमत हिंदुस्थानात 2 लाख 99 हजार 900 रुपये आहे. या फोनच्या किंमतीवरून आणि त्याच्या दुरुस्तीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा फोन बिघडल्यास दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी तब्बल सवादोन लाख रुपये खर्च करावे लागतील, असे समोर आले आहे. आयफोन डय़ुओची तीन लाख रुपये किंमत पाहून आधीच ग्राहकांना घाम फुटला आहे. आता या फोनच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. विना अॅपल केअर प्लस, बाहेरचा डिस्प्ले बदलण्यासाठी 1 लाख 19 हजार 900 रुपये खर्च येऊ शकतो.
दुरुस्तीचा प्रकार केअर प्लसविना केअर प्लससोबत
आतील डिस्प्ले 1,49,900 8,900 रुपये
बाहेरचा डिस्प्ले 42,900 2,500 रुपये
रियर कॅमेरा 26,900 00 रुपये
बॅटरी बदलणे 24,900 00 रुपये
बॅक ग्लास 20,900 2,500 रुपये
कव्हर लेयर 5,900 1900 रुपये
अन्य डॅमेज 2,24,900 8,900 रुपये
- जर फोनसाठी अॅपल केअर प्लस प्लॅन घ्यायचा असेल तर यासाठी एकाच वेळी 51,900 रुपये किंवा दर महिन्याला 4,709 रुपये द्यावे लागतील. जर एखादा ग्राहक आयफोन डय़ुओ सोबत अॅपल केअर प्लस प्लॅन घेत असेल तर त्या ग्राहकाला एकूण खर्च 3,51,800 रुपये द्यावे लागतील. फोनला काही झाल्यास त्यासाठी 2,24,900 रुपये खर्च येईल.
























































