उशीर केलात, आता येऊन तुम्ही काय करणार? सरनाईकांवर पुर्णेकर कुटुंबीय कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना रोषाचा सामना करावा लागला. आमच्या बाबांची हत्या होऊन 18 दिवस उलटले आहेत. तुम्ही यायला उशीर केलात आणि आता येऊन तुम्ही काय करणार? सत्तेच्या जोरावर तुमचं चाललंय… सत्ता मोठी नसते… माणुसकी मोठी असते लक्षात ठेवा, अशा शब्दांत पुर्णेकर कुटुंबीय प्रताप सरनाईकांवर कडाडले.

पुर्णेकर कुटुंबियांच्या या सरबत्तीने सरनाईक खजील झाले, सपशेल निरुत्तर झाले. हत्येच्या घटनेला इतके दिवस होऊन तुम्ही आज येत आहात. खरंतर बारा दिवसांत येऊन तुम्ही आम्हाला सहकार्य करायला हवे होते. ते तुम्ही केले नाही. आता येऊन उपयोग काय? असा संतापही पुर्णेकर कुटुंबाने व्यक्त केला.

एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेला पाठीशी का घालत आहेत?

पुर्णेकरांच्या हत्येची मास्टरमाइंड मीनाक्षी शिंदे राजरोसपणे फिरत आहे. राजेंद्र शिंदेची कसून चौकशी केली काय?, चौकशीला बोलावून त्याला चहापाणी देऊन सोडून देतात, एकनाथ शिंदे का तिच्यामागे उभे आहेत, असा संतप्त सवाल पुर्णेकर कुटुंबियांनी केला. तिची पदावरून तत्काळ हकालपट्टी करा अशी मागणी पुर्णेकर कुटुंबियांनी केली.