
मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. तीन अज्ञात हल्लेखोरानी अचानक हा हल्ला केला. या हल्ल्यात टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथील पुष्पा पार्क या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची तातडीने दाखल घेत मुंबई पोलीस आता अॅक्शन मोडवर आले असून पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलीस तपास करत आहेत.

























































