संजय राऊत यांच्या बोध कीर्तन पुस्तकाचे 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशन, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अंबरीश मिश्र उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या माध्यमातून हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अंबरीश मिश्र यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.