
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू येथे जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात आरोपींनी गाडीसमोर येऊन त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आरोपींची ओळख पटवण्यात यश आले असून प्रमुख धागेदोरेही पोलिसांना प्राप्त झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत पोलीस आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करतील. तसेच त्यांच्या पाठीशी कोण आहे त्यांनाही शोधून काढतील, असे फडणवीस म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
गोळीबाराची घटना निंदनीय असून पोलिसांनी तात्काळ या संदर्भातील कारवाई सुरू केलेली आहे. मागच्या काळातही या लोकांना अशा पद्धतीने प्रयत्न केला तेव्हाही मुंबई पोलिसांनी आरोपींना शोधून काढले होते. त्यांचे आकाही शोधून काढले होते. कुठल्याही परिस्थिती अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. हे सुपारी घेऊन काम करणारे लोक असून त्यांना महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेरून ऑपरेट केले जात आहे. पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, पण केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत समन्वय साधून या ऑपरेशन्सला नेस्तनाबूत करण्याचे काम पोलीस करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहूमध्ये जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी गाडीसमोर येऊन गोळ्या झाडल्या. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. https://t.co/Hj7Pzw5SuV
— Saamana Online (@SaamanaOnline) October 19, 2026


























































