ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत; अभिजीत दीपके यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अनेक निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे आणि त्याची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याचे समोर आले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी निवडणूक आयोगासह भारतीय जनता पक्षावर चौफेर टीका केली आहे. यामुळे ज्ञानेश कुमार वादात सापडले असून आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत, अशी टीका दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केली.

ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर आणि निर्णयप्रक्रियेवर अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या काळात तब्बल 14 वेळा या दोन्ही आयुक्तांनी मुख्य आयुक्तांच्या भूमिकेला विरोध दर्शवल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले. यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून निवडणूक आयोगाच्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढले जात आहेत.

अभिजीत दीपके यांची टीका

अभिजीत दीपके यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगावर टीका केली. “ज्ञानेश कुमार हे हिंदुस्थानचे शत्रू आहेत. अहवालानुसार मतदार यादीतून 12 कोटींहून अधिक नावे हटवण्यात आली आहेत. हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नोंदणीकृत असलेल्या 97 कोटी मतदारांच्या सुमारे 12.4 टक्के इतके आहे. भाजपप्रणीत एनडीए आणि विरोधकांमधील फरक अवघा 2 टक्के होता. ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून, आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत”, अशी टीका दीपके यांनी केली.

ज्ञानेश कुमार यांना हटवा, तुरुंगात पाठवा, उद्धव ठाकरे यांची मागणी