
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी एका सुनावणीसाठी वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्याने बंगालमधील नादिया जिह्यातील एका न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल 28 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.


























































