
हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या वाढीविषयी मोठमोठे दावे करणाऱया मोदी सरकारला बँक ऑफ अमेरिकेच्या ताज्य सर्वेक्षणाने आरसा दाखवला आहे. ‘बोफा’च्या ताज्या पाहणीनुसार, हिंदुस्थानी शेअर बाजार हा आशियातील सर्वात कमी पसंतीचा शेअर बाजार ठरला आहे. याबाबतीत इंडोनिशियाच्या स्टॉक मार्पेटची कामगिfरी हिंदुस्थानपेक्षा सरस ठरली आहे.
‘बोफा’ने 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान यासंदर्भात सर्वेक्षण केले. तब्बल 272 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱया 98 फंड मॅनेजर्सची मते जाणून घेण्यात आली. यातील 32 टक्के मॅनेजर्सनी हिंदुस्थानी शेअर बाजाराबद्दल नापसंती दर्शवली. ‘ब्लूमबर्ग’ने या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, हिंदुस्थानी शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदार अधिक साशंक व सावध झाले आहेत. इंडोनेशियाच्या मार्पेटवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, तर जपान आणि तैवानच्या शेअर बाजाराला गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती आहे.
अधिक चांगला परतावा मिळवू पाहणारे गुंतवणूकदार हिंदुस्थानी समभागांच्या उच्च मूल्यांकनामुळे निरुत्साही आहेत. जागतिक पातळीवर सर्वाधिक गुंतवणूक ‘एआय’वर होत आहे. मात्र, हिंदुस्थानी कंपन्या ‘एआय’च्या वापरात तुलनेने बऱयाच मागे आहेत. त्यामुळेदेखील गुंतवणूकदार निराश झाले आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती हे आणखी एक कारण हिंदुस्थानी शेअर बाजाराचे आकर्षण कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.
नापसंतीची कारणे काय?
- मंदावलेला आर्थिक विकास दर
- आर्थिक सुधारणांचा अभाव
- समभागांचे उच्च मूल्य
- हिंदुस्थानी कंपन्यांकडून एआयचा मर्यादित वापर


























































