
>> प्रसाद ताम्हनकर
‘कृष्णद्रव्य’ म्हणजे काय हे पटकन अनेकांच्या लक्षातदेखील येणार नाही. काहींना कधीतरी हा शब्द समोर आल्याचे, कानावरून गेल्यासारखे वाटेल, पण पटकन अर्थबोध होणार नाही. याउलट ‘डार्क मॅटर’ असा शब्द वापरला की, अनेकांना चटकन खुलासा होईल. ‘कृष्णद्रव्य’ अर्थात ‘डार्क मॅटर’ने विश्वातील एकूण वस्तुमानापैकी सुमारे 80 टक्के वस्तुमान एकटय़ाने व्यापलेले आहे. ते डोळ्यांना दिसत नाही, साध्या दुर्बिणीनेदेखील दिसत नाही. ते प्रकाश किंवा विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग करत नाही, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे त्याचे अस्तित्व व त्याच्या गुणधर्मांचे अनुमान शास्त्रज्ञांनी केले आहे.
इतक्या महत्त्वाच्या अशा द्रव्याबद्दल शास्त्र्ाज्ञांना अजूनदेखील फारशी काही माहिती नाही. त्याच्या अभ्यास करण्याच्या दृष्टीने आता स्वित्झर्लंड येथे ‘सर्न’ अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ न्यूक्लिअर रिसर्चने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडे असलेल्या जगातील सर्वात ताकदवान अशा पार्टिकल एक्सिलेटर ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’ला त्यासाठी खास अपग्रेड करण्यात आले आहे. शास्त्र्ाज्ञांना जर या कृष्णद्रव्याची माहिती मिळवण्यात यश आले तर हे ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’चे पुन्हा एकदा मोठे यश असेल. कारण यापूर्वी ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’च्या मदतीने ‘हिग्ज बोसॉन’ अर्थात ‘देवकणा’चा शोध लावण्यात शास्त्र्ाज्ञांना अभूतपूर्व असे यश मिळालेले आहे. या शोधाला 21 व्या शतकातील सर्वात मोठा शोध मानले जाते.
देवकणाच्या शोधाच्या वेळी उपलब्ध झालेली माहिती आणि आता ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’च्या (LHC) अपग्रेड केल्यानंतर केल्या जाणाऱया प्रयोगातून जी माहिती उपलब्ध होईल, त्यातून कृष्णद्रव्याचे रहस्य उलगडण्यास प्रचंड मदत होईल अशी शास्त्र्ाज्ञांना आशा आहे. ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’ (LHC) आश्चर्यकारक वाटावी इतक्या मोठय़ा प्रमाणात ऊर्जा वापरते. वर्षभरात साधारण तीन लाख घरांमध्ये जितकी वीज वापरली जाते तितकी वीज एकटय़ा CERN मध्ये खर्च होते. यातील काही ऊर्जा ही प्रोटॉनचा वेग वाढविण्यासाठी वापरण्यात येते. त्याचा वेग जवळ जवळ प्रकाशाच्या वेगापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो; जेणेकरून जेव्हा तो आदळतो तेव्हा तो लहान कणांमध्ये विभाजित होतो. संपूर्ण ब्रह्मांडाचा 80 ते 85 टक्के हिस्सा व्यापणारा हा पदार्थ प्रकाशाशी अजिबात संपर्क साधत नसल्याने त्याला ‘डार्क मॅटर’ अर्थात ‘कृष्णद्रव्य’ संबोधण्यात येते. हा पदार्थ डोळ्यास दिसणेदेखील शक्य नसल्याने आजवर शास्त्र्ाज्ञांनी याबद्दलचे अप्रत्यक्ष असे पुरावे फक्त तपासले आहेत. या कृष्णद्रव्याचा सखोल असा अभ्यास झालेला नाही. हे कण अजूनही गूढपणाचे कवच घेऊन बसलेले आहे असे म्हणायला हरकत नाही. हा कण नक्की कसा आणि कशाचा बनलेला असेल याबद्दल शास्त्र्ाज्ञांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. त्यातील WIMP (Weakly Interacting Massive Particle) हा सिद्धांत शास्त्र्ाज्ञांचा आवडता असा मानला जातो.
अवकाशाचा कोणताही भाग रिक्त नाही. प्रत्येक ठिकाणी द्रव्याचे अस्तित्व आहे, असे काही शास्त्र्ाज्ञ सांगतात. अवकाशाचा अवघा पाच टक्के भाग हा मानवाच्या निरीक्षणात येतो. या पाच टक्क्यांपैकी साडेतीन टक्के भाग तेजोमेघ आणि वायूंचा आहे, तर उरलेल्या दीड टक्क्यात ग्रह, उपग्रह, कृष्णविवर, तारे इत्यादींचा समावेश होतो. विश्वनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील कृष्णविवर हे विश्वातील कृष्णद्रव्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत असल्याच्या सिद्धांत विश्वरचना शास्त्र्ाज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मांडला होता. मात्र, विश्वात 68 टक्के कृष्णद्रव्य असल्याचे सांगण्यात येत असले तरी कृष्णद्रव्य अस्तित्वातच नाही असे जगातील काही शास्त्र्ाज्ञांचे ठाम मत आहे. पुण्यातील ‘आयुका’सारख्या मान्यवर संस्थेतदेखील कृष्णद्रव्यावर मोठे संशोधन करण्यात आले आहे, तर हिंदुस्थानच्या ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ (आयआयटी) येथील शास्त्र्ाज्ञांनी कृष्णद्रव्याची निर्मिती ही न्युट्रिनोच्या उत्पत्तीशी निगडित असल्याचा दावा केला आहे. न्युट्रिनो या सबऍटॉमिक (अणूपेक्षाही सूक्ष्म) कणांना वस्तुमान नसल्याचे आजवर मानले जात होते.
– [email protected]




























































