
सूत्रधार’ या संस्थेने फादर्स डेच्या निमित्ताने रविवार, 21 जून रोजी जन्मदाता पित्याची महती सांगणारा दृश्राव्य, सांगीतिक कार्यक्रम ‘बाप माणूस’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मिनी थिएटर येथे रात्री 8.15 वाजता होईल. ‘बाप माणूस’ची संकल्पना, लेखन, निवेदन अनिल हर्डीकर यांचे असून सहनिवेदन आरती शेट्टी करणार आहेत. प्रसाद दलाल आणि पूर्वा पाठक सुमधूर गीते सादर करतील. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू पराग खोत सांभाळणार आहेत. वडिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे व्हिडीओ हे कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. प्रवेशिकांसाठी संपर्क- 9819340146.





























































