
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली, असे ट्विट भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले होते. या विरोधात रत्नागिरीत संतापाची लाट उसळताच ट्विटरवर टायपिंग मिस्टेक झाल्याची सारवासरव करताना चित्रा वाघ यांनी आपली फेसबुक पोस्ट पुढे केली आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकताच रत्नागिरीत दौरा केला.यावेळी त्यांनी पतितपावन मंदिरात दर्शन घेतले. त्याची छायाचित्रे ट्विटरवर टाकताना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली असे ट्विट केले. पतितपावन मंदिर दानशूर भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले असताना त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भंडारी समाजाने संताप व्यक्त केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भंडारी समाजाने संयुक्त पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचा निषेध केला. त्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटरवर टायपिंग मिस्टेक झाल्याचे सांगत सारवासारव केली. तसेच आपली फेसबुक पोस्ट पुढे केली.
‘चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अन्यथा…’, वादग्रस्त ट्विटवरून वातावरण पेटले, भंडारी समाजामध्ये संताप
फेसबुक पोस्टमध्ये भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्व जातीतील लोकांना खुले असे मंदिर निर्माण करून अस्पृश्यता निर्मुलनाची आणि सामाजिक समरसतेची एक क्रांती घडवली असा उल्लेख करण्यात आला आहे.
चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा, पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधल्याचा जावई शोध