मुलींची छेड काढणाऱ्यांचे हात तोडून आणा, २ लाखांचे बक्षीस देईन; पप्पू यादव यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी खुर्दा महोत्सवामध्ये एक वक्तव्य केले आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांचा हात तोडून आणणाऱ्या व्यक्तीला २ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी मंचावरून केली.

पूर्णियाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मधेपुरा जिल्ह्यातील कुमारखंड ब्लॉकमधील त्यांच्या खुर्दा या मूळ गावी दुर्गा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खुर्दा महोत्सवातील आपल्या भाषणादरम्यान पप्पू यादव यांनी मुलींच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत गुन्हेगारांविरुद्ध कडक प्रतिकार करण्याचे आवाहन केले. याच वेळी त्यांनी छेड काढणाऱ्यांचा हात कापून आणणाऱ्याला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. “मुलींसोबत छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात महाभारतापेक्षाही मोठे युद्ध होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.