पेन्शनधारकांसाठी नवीन पोर्टल सेवा सुरू! पेन्शनची कामं झटपट होणार…

पेन्शनधारकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने ‘एकीकृत पेन्शनर पोर्टल’ (इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल) सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे पाच बँकांची पेन्शन प्रोसेस आणि पेमेंट सर्व्हिस एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. तसेच या पोर्टलवर पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्राची स्थिती, मासिक वेतन स्लिप, चेक आणि फॉर्म 16 सबमिट करू शकतील. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने पेन्शनधारकांच्या पोर्टलची माहिती देताना म्हटलंय की, पेन्शन सेवा डिजिटल आणि पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पाच बँकांच्या पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट सेवांसाठी एक विंडो मिळते. या माध्यमातून पेन्शनधारक अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म

पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी नवीन पेन्शन पोर्टल तयार केले आहे. पेन्शनधारकाचे वैयक्तिक आणि सेवा तपशील या प्रणालीद्वारे मिळू शकतील. पेन्शन फॉर्म ऑनलाइन सबमिट करू शकतात. पेन्शन मंजुरीचे स्टेटस एसएमएस किंवा ईमेलद्वारे समजेल.

 पेन्शन सुरू करण्यापासून पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. पेन्शनच्या स्थितीची माहिती मोबाईल किंवा ई-मेलद्वारे मिळणार आहे.
 निवृत्तीधारक त्यांची आवश्यक कागदपत्रे भविष्य पोर्टलवर ऑनलाइन सबमिट करू शकतात.
 पेन्शन स्लिप, जीवन प्रमाणपत्राची स्थिती तपासता येईल.