10 रुपयांच्या दोन नोटांची किंमत अडीच लाख

हिंदुस्थानातील 10 रुपयांच्या दोन नोटांना लिलावात बोली लागणार असून या दोन नोटांसाठी तब्बल 2 लाख 60 हजार रुपये मोजले जाण्याची शक्यता आहे. या नोटा 106 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजात सापडल्या होत्या. 29 मे रोजी लंडन येथे या नोटांचा लिलाव होणार आहे. 1918 मध्ये एसएस शिराळा नावाचे जहाज लंडनहून मुंबईला येत असताना बुडाले होते. या जहाजावर जर्मन यू-बोटीने हल्ला केला होता. त्या वेळी विमानात 213 लोक होते. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला होता. 25 मे 1918 रोजी ‘एसएस शिराळा’ या जहाजातून जप्त केलेली नोट लंडनमधील नूनन्स मेफेयर लिलाव गृहात विक्रीसाठी ठेवली जाणार आहे. या नोटा बँक ऑफ इंडियाने छापल्या होत्या. यामध्ये 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटांचा समावेश होता.