इस्रायलवर पुन्हा एकदा हमासचा मोठा हल्ला, गाझातून राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागली

इस्रायलवर हमासने पुन्हा एकदा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असून, गाझातून इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रs डागण्यात आली आहेत.

हमासला गाझा पट्टीत इस्रायलने आक्रमक चढाई करत चेपले असतानाच अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलच्या मध्यवर्ती प्रदेशांत पुन्हा एकदा रॉकेट हल्ल्यांचा इशारा देणाया भोंग्यांचे आवाज आज घुमत होते. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्यानंतर आता अनेक महिन्यांनी हमासने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रs डागल्याची जबाबदारी हमासचे सशस्त्र दल असलेल्या अल-कासम ब्रिगेडने घेतली आहे.

आजवर हमासने गाझा पट्टीच्या सीमेवर असलेल्या इस्रायली वसाहतींवर रॉकेट आणि मॉर्टरचा मारा सुरू ठेवला होता. मात्र अनेक महिन्यांनी लांब पल्ल्याची रॉकेट हमासने तेल अवीवच्या दिशेने डागली. राफा भागातून आठ क्षेपणास्त्र डागले गेले असल्याचे सांगितले जाते. यातील काही रॉकेट हवेतच निकामी केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.