… तर ब्रिटनमध्ये लष्करी सेवा अनिवार्य होणार

निवडणूक जिंकलो तर 18 वर्षांच्या तरूणांना सैन्य सेवा अनिवार्य करण्याचे सुतोवाच पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केले आहे. यासाठी नॅशनल सर्व्हिस रूल परत आणू. यामुळे राष्ट्रीय भावना निर्माण होईल, असे ते म्हणाले. या नियमानुसार, 18 वर्षांच्या तरुणांना एका वर्षासाठी सैन्यात सामील व्हावे लागेल किंवा 25 दिवसांसाठी पोलिस किंवा राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) सारख्या सामुदायिक संस्थांमध्ये स्वयंसेवक व्हावे लागेल. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.