
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व दीपिका पदुकोण यांचा पठाण हा बहुचर्चित सिनेमा आज देशभरात रिलीज झाला. चंद्रपूर शहरातील सर्व सहाही सिनेमागृहात आज सकाळी 9 वाजता हा सिनेमा पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित करण्यात आला.चित्रपटगृहांबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच्या सर्व सहा चित्रपटगृहांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. दरम्यान सहाही सिनेमागृहात पठाणचा पहिला शो हाऊसफुल्ल होता.

































































