हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणाऱ्याला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू मागासवर्गीय व्यक्तीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पूर्वीच्या सामाजिक दर्जाच्या आधारे मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने तामिळनाडू सरकारची याचिका फेटाळत मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसेच हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त अन्य धर्म मानणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.