
डॉक्टर्स डेचे औचित्य साधून परळ येथील नाना पालकर स्मृति समितीच्या वतीने मानवतेच्या सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, 4 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता, दादारच्या राजा शिवाजी विद्यालयातील बी. एन. वैद्य सभागृहात होईल. यावेळी नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली येथील वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यकारी सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी आणि नवी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचे सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. अमर देशपांडे यांना गौरवण्यात येईल. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे सीईओ अतुल कुमार गोयल यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.
1968 पासून नाना पालकर स्मृती समिती ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ध्येय ठेवून कार्यरत आहे. डॉक्टरांच्या सन्मान सोहळ्यात उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे आणि सचिव सतीश तांबा यांनी केले आहे.

























































